- क्राईमपुणे
- September 20, 2022
- No Comment
सावधान!कपड्यांच्या मोठ्या ब्रन्डच्या नावाखाली होत आहे ग्राहकांची फसवणुक,सोशल मिडीयाचा होतोय वापर
पुणे: नामांकित कंपन्यांचे शर्ट,पॅन्ट, जीन्स,शुजची आकर्षक जाहिरात बनवुन ती सोशल मिडियावर दाखवुन भुरळ पाडली जाते व आम्ही आपला कसा आणि किती फायदा करुन देतो, अशा पद्धतीने सामान्यांना गंडा घातला जातो.यामध्ये आमच्या मालाला खुप मागणी आहे,तुम्ही तात्काळ आम्हाला संपर्क करा,अन्यथा हा माल संपुन जाईल अशा भपक्या मारणारे,आता आपापल्या नावाचे ब्रन्ड बनवत लाखो तरुणांची आर्थिक फसवणुक करत आहे.यांचे मुख्यत्वे लक्ष हे ग्रामीण भागातील तरुण आहे.आव्हाळवाडील रवींद्र जाधव यांनी फेसबुक रील्स वरुन एक जाहिरात पाहिली,या जाहिरातीला भुलून त्यांना कपड्याचे नमुने व्हाट्सएप द्वारे त्यांना पाठविण्यात आले.त्यांनी पैसे ऑनलाईन पाठवले,परंतु ठरलेल्या पद्धतीने काही घडले नाही त्यांना लक्षात आले कि आपणास फसवण्यात आले.
जे कपडे मिळणार अस सांगितल:👇
जे कपडे मिळाले:👇
आमची फसवणूक झाली पण ईतरांची व्हायला नको.असे मत महाराष्ट्र क्राईम वॉच सोबत बोलताना व्यक्त केले.सोशल मिडीयावर मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाखाली होणारी फसवणूक पाहता प्रशासन का गप्प आहे हे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.