- September 19, 2022
- No Comment
जबरदस्ति करुन तरुणीचा विनयभंग, रोडरोमिओ जेरबंद
चाकण: कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत थांबलेल्या तरुणीचा हात पकडून तिला कारमध्ये खेचण्याचा प्रयत्न करत विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रकार 2021 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत घडला
याप्रकरणी तरुणीने चाकण पोलिसात तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी विशाल सोमनाथ गारगोटे (रा.वाकी, खेड) याला अटक केली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही तिच्या घरातून कॉलेजला जाण्यासाठी निघाली असता आरोपी हा तिचा पाठलाग करत असे. तसेचतिला माला तुढ्याशी लग्न कराये आहे म्हणून तगादा लावत असे. 25 ऑगस्ट रोजी ही फिर्यादी बसची वाड बघत असताना आरोपी त्याची कार घेऊन तेथे आला व त्याने मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे तु माझ्या सोबत चल असे सांगून फिर्यादी हात धरून त्यांना गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा फिर्यादी मोठ-मोठ्याने ओरडल्या असता तो तिथून पळून गेला. त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादीने पोलीस तक्रार दिली. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.