व्यावसायिकांना मॉल्‍समध्‍ये जागाच जागा उपलब्ध

व्यावसायिकांना मॉल्‍समध्‍ये जागाच जागा उपलब्ध

बदललेल्या लार्इफस्टार्इलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिकपद्धतीने सुरू करण्यात येत असलेल्या शॉपिंग मॉल्सला आजही नागरिकांची पसंती आहे. त्यामुळे कोरोनाच्या झटक्यातून स्थिरावलेल्या बांधकाम क्षेत्राने पुण्‍यात २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीपर्यंत ७.१ दशलक्ष चौरस फूट जागा भाड्याने देण्‍यासाठी उपलब्‍ध असल्‍याची नोंद केली आहे. व्यवसायिकांना मॉल्‍समध्‍ये व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे यातून स्पष्ट होते.

पुण्यातील मॉलमध्ये उपलब्ध असलेल्या जागेचे प्रमाण देशातील एकूण मॉल जागेच्‍या आठ टक्‍के आहे. देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये असलेल्या २७१ मॉल्‍समध्‍ये भाड्याने जागा देण्‍याचे क्षेत्रफळ २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये ९२.९ दशलक्ष चौरस फूट होते. डिसेंबर २०१९ पर्यंत या शहरातील २५५ मॉल्‍समध्‍ये भाड्याने देण्‍यात आलेल्‍या जागेत ७७.४ दशलक्ष चौरस फुटापर्यंत वाढ झाली आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया’ने आपला नवीन अहवाल ‘थिंक इंडिया, थिंक रिटेल २०२२’ नुकताच जाहीर केला. त्यात या बाबी नमूद आहे. पुण्‍यामधील श्रेणीनुसार मॉल जागेचे वितरण २०२२ च्‍या पहिल्‍या सहामाहीपर्यंत शहरातील ग्रेड बी मॉल्‍सचा वापर एकूण जागेमध्‍ये ५३ टक्‍क्‍यांपर्यंत होता.

ग्रेड – मॉलची संख्या – जागेतील एकूण वाटा (टक्केवारी) ए – ५२ – १९ बी – ९४ – ३५सी – १२५ – ४६ मॉलमधील जागांना पसंती का? – मोठ्या प्रमाणात येणारे ग्राहक – जागा भाड्याने देण्‍याचे मोठे प्रमाण- जागेची उत्तम स्थिती- सक्रिय मॉल व्‍यवस्‍थापन मॉलचा सीएजीआर दर वाढू शकतो आर्थिक वर्ष २०१७ ते २०२२ दरम्‍यान देशातील प्रमुख आठ शहरांमध्‍ये शॉपिंग मॉल्‍समधील वापर तीन टक्‍के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (सीएजीआर) वाढून आठ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचले. आर्थिक वर्ष २०२३ मध्‍ये संभाव्‍य वापर कोविड-१९ पूर्वीच्‍या प्रमाणांना पार करत ११ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. देशातील मॉल्‍समधील संभाव्‍य वापर आर्थिक वर्ष २०२२ ते २०२८ दरम्‍यान २९ टक्‍के सीएजीआर दराने वाढण्‍याची अपेक्षा आणि आर्थिक वर्ष २०२८ मध्‍ये ३९ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचू शकतो. रिटेल रिअल इस्‍टेट क्षेत्र परिपक्‍वतेच्‍या नवीन स्‍तरावर पोहोचले आहे. लहान आकाराच्‍या व अल्‍प श्रेणीच्‍या ‘ग्रेड ए’ मॉल्‍सच्या वाढीचा मार्ग मोकळा केला आहे. विद्यमान ग्रेड ए मॉल्‍सचा हिस्‍सा ९५ टक्‍क्‍यांहून अधिक आहे. ज्‍यामधून या विभागामध्‍ये दर्जेदार बांधकामाची मागणी दिसून येते. कार्यालयीन विभागाप्रमाणे एकत्रीकरणानंतर रिटेल रिअल इस्‍टेटमध्येही भविष्‍यात गुंतवणुकींसाठी मोठी संधी देईल.‍- शिशिर बैजल, व्‍यवस्‍थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *