प्रवासात महिलेची चाळीस हजारांची सोनसाखळी लंपास, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 10, 2022
- No Comment
पुणे: पुणे मनपा ते भोसरी या दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना प्रवासी महिलेच्या गळ्यातील 40 हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली.
याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी सायंकाळी साडेचार वाजता पुणे मनपा बस थांबा येथून भोसरी कडे पीएमपीएमएल बसने निघाल्या. त्या सायंकाळी पावणे सहा वाजता भोसरी येथे पोहोचल्या. या प्रवासात त्यांच्या गळ्यातील 40 हजारांची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.