- September 19, 2022
- No Comment
मोबाईल चोरुन मारहाण करणार्यां तीन टाळक्यांवर गुन्ह दाखल
पिंपरी: नेहरुनगर येथे तीन ते चार जणांच्या टोळक्याने घरात घुसून मारहाण करत दोघांचे मोबाईल जबरदस्ती चोरून नेले आहेत.
याप्रकरणी गोविंद गुमान विश्वकर्मा (वय 35 रा. नेहरुनगर) यांनी फिर्याद दिली असून सुमंत गडकर (वय 19 रा. नेहरुनगर) व त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घरात जबरदस्तीने घुसून आरोपींनी फिर्यादी काम करत असलेल्या लोटस कोर्ट ह़ॉटेलचे सहकारी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांडक्याने मारून फिर्यादी यांनाही जखमी केले. तसेच त्यांचे सहकारी रुप मुकान सिंग व राजेंद्र दुर्गा थापा यांचे 18 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल हिसकावून नेले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.