- September 20, 2022
- No Comment
जमिन विकत घेताय?छोटे प्लॉट करून विक्री कायदेशीर आहे का?
एक गुंठा ते पाच गुंठा शेतजमीनीच्या विक्रीच्या आकर्षक जाहीराती आपण नेहमीच बघतो.बिनशेती जमीनीपेक्षा स्वस्त वाटणारे हे प्लॉट विकत घेणं हे कायदेशीर आहे का?
शेत जमीनीचे लहान तुकडे होत गेल्याने जमीन लागवडीला किफायतशीर होत नाही. म्हणून सरकारने जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध केला आहे.तसेच आढळल्यास या वर कायदा देखील केलेला आहे. या कायद्यामुळे विक्रीसाठी कमीत कमी किती शेतजमीन असणे आवश्यक आहे हे ठरविण्यात आले असुन,त्यापेक्षा लहान जमीन खरेदीचा व्यवहार केला तर तो बेकायदेशीर ठरतो.
असा व्यवहार करावयाला कायद्याने बंदी आहे. तुकडाबंदी कायदा मोडून केलेल्या व्यवहारातून खरेदी केलेल्या जागेवर बांधकामास कायदेशीर मंजुरी मिळत नाही. या जमीनीवर घर बांधणाऱ्यांना कसलेही कायदेशिर संरक्षण प्राप्त होत नाही. शेतजमिनीत “प्लॉटिंग” करून त्यातील क्षेत्र गुंठ्याने विकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच जर आढलले तर अशा खरेदीदारांची नोंद सात-बारा उताऱ्यावर घेतली जात नाही. बागायती जमिनीसाठी दहा गुंठे क्षेत्रासाठी एकच खरेदीदाराची नोंद होऊ शकते. परंतु दहा गुंठ्यांसाठी एकापेक्षा जास्त खरेदीदार असणे म्हणजेच जमिनीचे तुकडे पाडणे, त्यामुळे दहा गुंठ्यांत पुन्हा विभागणी करता येणार नाही. दहा गुंठ्यांत एकापेक्षा जास्त खरेदीदार असतील, तर त्याची सात-बारावर मालक म्हणून नोंद होत नाही.