• September 21, 2022
  • No Comment

झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग, आरोपी गजाआड

झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग, आरोपी गजाआड

कोंढवा: जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयने 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 40 वर्षीय डिलिव्हरी बॉयने त्या तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतले.

येवलेवाडी परिसरात हा प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

रईस शेख (वय 40, रा.कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. शनिवारी रात्री तिने ऑनलाईन जेवण मागवले होते. हे पार्सल घेऊन आरोपी रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास तिच्या सोसायटीत आला होता. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने फिर्यादीला पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाना करून त्याने फिर्यादी यांचा हात हातात घेतला. फिर्यादी यांनी हात सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने हात घट्ट पकडून फिर्यादीला जवळ ओढले आणि त्यांच्या गालाचे दोन वेळा चुंबन घेतले.

या सर्व प्रकारानंतर फिर्यादी तरुणीने पोलीस स्टेशन मधे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

Related post

रात्रीच्या वेळी मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

रात्रीच्या वेळी मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, तिघांचा…

वाघोली: भरधाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले असल्याचे वृत्तसेमोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.…
पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी किंवा मृत झाल्यास… देणार आर्थिक मदत

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी…

पुणे: पुणे शहरात नैसर्गिक दुर्घटना किंवा प्राण्यांच्या हल्याच जखमी झालेल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. पुणे शहरात झाड पडून अथवा…
गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *