- September 21, 2022
- No Comment
बारामती:डेंग्यूने घेतला महिला पोलिसाचा जीव
बारामती: डेंग्यूने आजारी असलेल्या एका महिला पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शितल जगताप गलांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात त्या कार्यरत होत्या.
पुण्यातील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्यांनी एका बाळाला जन्म दिला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून शितल या प्रसुती रजेवर होत्या. दहा दिवसांपूर्वी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्मही दिला. यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बाळ असा परिवार आहे.