• September 23, 2022
  • No Comment

सीआरपीएफ जवानाने गळफास घेऊन केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

सीआरपीएफ जवानाने गळफास घेऊन केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

तळेगाव: तळेगाव दाभाडे येथे सीआरपीएफ जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद शिपने म्हणाले, की ‘अमरीश कुमार गिरी (वय 30 वर्षे) असे गळफास घेतलेल्या जवानाचे नाव आहे. तो मूळचा मिर्जापुर, उत्तर प्रदेश येथे राहणारा आहे. तो एक महिना सुट्टी घेऊन आपल्या गावी गेला होता व परवा तळेगाव दाभाडे येथे आला होता.

सकाळी तो कामावर रुजू होण्यासाठी कार्यालयात आला होता. कर्मचाऱ्यांना तो टेरेसवरील शोरूममध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला. पोलिसांना तळेगाव दाभाडे पोलिसांना कळवले. त्यामुळे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. जवानाला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली व रूममध्येही शोधले पण कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. मृत जवान त्याच्या पत्नीसोबत तळेगाव दाभाडे शहरात राहत होता व त्याला दोन ते तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शरद शिपने हे पुढील तपास करीत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *