• September 23, 2022
  • No Comment

स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचा छापा, चार महिलांची सुटका

स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचा छापा, चार महिलांची सुटका

मोशी: मोशी प्राधिकरण येथील क्राऊन नावाच्या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा मारून कारवाई केली. त्यात चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.

स्पा मॅनेजर खतिजा मोजिब खान (वय 21, रा. भोसरी), स्पा मालक अजय अरुण वाळके (वय 32, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चार महिलांना पैशाचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्राप्त केले. महिलांकडून स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करून घेतला.याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *