• September 23, 2022
  • No Comment

लोकांचे आजार बरे करतो असे सांगून चार लाख केले लंपास, तिन आरोपी जेरबंद

लोकांचे आजार बरे करतो असे सांगून चार लाख केले लंपास, तिन आरोपी जेरबंद

चाकण : लोकांना दृष्टी येईल, मुके बोलू लागतील, मणक्याचे आजार बरे होतील, संतती प्राप्त होईल अशा बहाण्याने जडीबुटीची विक्री करून चार लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना माणिक चौक चाकण येथील कृष्णा आयुर्वेदिक जडीबुटी भांडार येथे घडली.

अश्विनी दत्तात्रय शिंदे (वय 26, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेमराज उमाजी गोसावी (वय 19), संजीव लिंबाजी गोसावी (वय 30), विश्वजित लिंबाजी गोसावी (वय 22, रा. चाकण), या तिघांना अटक केली असून डॉ. रमेश जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना चार लाख रुपयांची आयुर्वेदिक औषधे दिली. त्याचा फिर्यादी यांना काहीही परिणाम झाला नाही. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह अन्य लोकांना दृष्टी येईल, मुके बोलू लागतील, मणक्याचे आजार बरे होतील, संतती प्राप्त होईल अशा बहाण्याने गंडा घातला आहे. पोलिसांनी प्रेमराज, संजीव आणि विश्वजित या तिघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *