- September 26, 2022
- No Comment
रावेत:पायी जाणाऱ्या महिलेचे अडीच लाखांचे मंगळसुत्र लंपास, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
रावेत: पायी जाणाऱ्या महिलेचे अडीज तोळ्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून घेतले. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर समीर लॉन्सजवळ घडली.
महिलेने या प्रकरणी महिलेने रावेत पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचे 40 हजारांचे मनी मंगळसुत्र, 5 तोळे वजनाचे 2 लाख रुपयांचे मंगळसुत्र असा एकूण 2 लाख 40 हजार रुपये वजनाचे दागिने हिसकावून नेले.
यावरून रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.