- September 27, 2022
- No Comment
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एक ची कामगिरी
पुणे: पुण्यात व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली आहे.
आमान समीर शेख (वय 22, रा. भवानीपेठ), अमीर समीर शेख (वय 22 रा. भवानीपेठ), अमोल अनिल अंबवने (वय 20 रा. भवानीपेठ), शाहरुख दाऊद सय्यद (वय 26 रा. कोंढवा), सादिक अमीर शेख (वय 25 रा.भवानीपेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात गस्त घालत असताना गुन्हे शाखा एकच्या पथकाला खबर मिळाली की, भवानी माता मंदिरा जवळील त्रिकोणे गार्डन येथे काही जण जमणार असून ते कोठे तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत अशी खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला असता काही जण संशयीत रित्या मिरा हॉस्पिटल पुढे चर्चा करताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात चौकशी केली असता भवानी मंदिराजवळील एक व्यापारी रोज रात्री दुकानबंद करून कॅश जवळ घेऊन जात असतो, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड असते त्याच्यावर पाळत ठेवून त्याला लुटण्याच्या तयारीत आरोपी असल्याचे त्यांनी पोलीस तपासात सांगितले.
यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 2 कोयते, नायलॉन दोरी, मिरची पुड, लाकडी दांडके असे साहित्य जप्त केले. आरोपी यांच्या विरोधात या आधीही खुनाचा प्रयत्न, मारामारी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. आरोपींना खडक पोलीसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास गुन्हे शाखा एकचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर करत आहेत.