- September 28, 2022
- No Comment
मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद, पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेची कामगिरी
पुणे: मोक्काच्या गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेने जेरबंद केला आहे.
जॅकी उर्फ स्वप्निल पडळघरे (वय ३५) रा. पडळघरवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे व नवनाथ बाळू भोईने (वय २८) राहणार मोरेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे. अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१/०९/२०२२ रोजी पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखा पथकाचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते व स्टाफने पौड पोलीस स्टेशन मोक्काच्या गुन्ह्यातील गेल्या २ वर्षापासून फरारी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले होते याच गुन्ह्यातील फरारी असलेले अजून दोन आरोपी रिहे परिसरात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती या मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेउन पुढील कायदेशीर कारवाई साठी पौड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील हवेली विभाग, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ पौड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, ईश्वर जाधव, पोलीस हवालदार विशाल भोरडे, मोसिन शेख या पथकाने केली. तांत्रिक मदत सायबर पोलीस स्टेशनचे सुनील कोळी व चेतन पाटील यांनी केली.