- September 28, 2022
- No Comment
दहिहंडीमध्ये हवेत गोळीबार करणारे सर्राइत गजाआड,चेतन ढेबे व साथीदारांवर मोक्का
सिंहगड: दहिहंडीमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या चेतन ढेबे व त्याच्या 16 साथीदारांवर सिंहगड पोलीसांकडून मोक्का अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळीच्या वर्चस्वासाठी परिसरात दहशत पसरवल्या प्रकरणी ही कारवाई कऱण्यात आली आहे.
चेतन पांडुरंग ढेबे (वय 25 टोळी प्रमुख), साथीदार बाळू धोडींबा ढेबे (वय 24), अनुराग राजू चांदणे (वय 20), रमेश धाकलु कचरे (वय 19 कात्रज गाव), वैभव शिवाजी साबळे (वय 20), रोहन दत्ता जाधव (वय 20), अक्षय तायाजी आखाडे (वय 21), सुनील धारासिंग पवार (वय 19) साहिल बबन उघडे व आठ विधीसंघर्षीत बालके यांच्यासह चेतन हा परिसरात टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी खुनाचा प्रयत्न करणे, कोयता व घातक शस्त्रे जवळ बाळगून दंगा करणे, मारामारी करणे असे गुन्हे त्यांच्यावर दाखल होते.
वेळोवेळी प्रतिबंध करूनही गुन्हे न थांबविल्याने पोलिसांनी अखेर ढेबे व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा पुढिल तपास सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार यांचा विभाग करत आहे.