- September 28, 2022
- No Comment
ऑनलाईन खोटे अॅग्रीमेंट करुन, तेवीस लाखांना घातला गंडा,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
हिंजवडी: व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेऊन ऑनलाईन खोटे अॅग्रीमेंट केले. क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास भाग पाडून 23 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली.
प्रशांत रमेश सिंग (वय 39, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बीसीएम इन्व्हेस्टमेन्ट ऍडव्हायझरी को लिमिटेड हॉंगकॉंग कंपनीचे ऍडव्हायजर म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने 18 मे रोजी फिर्यादींसोबत व्हाट्स अप द्वारे संपर्क केला. बीसीएम इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझरी को लिमिटेड, फायनान्शियल स्ट्रीट, हॉंगकॉंग या कंपनीच्या ऍडव्हायझरने व्हाट्स अप ग्रुप तयार केला. त्यात फिर्यादीस सामावून घेत त्यांच्याशी चॅट केले.ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधत त्यांच्याशी ऑनलाईन अॅग्रीमेंट केले. त्या आधारे फिर्यादीस 23 लाख 10 हजार रुपयांची क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास आरोपीने भाग पाडले. याबाबत आपली फसवणूक होत असल्याचे फिर्यादीस समजले असता त्यांनी आरोपीला ऑनलाईन संपर्क केला. मात्र आरोपीने कोणताही रिप्लाय न देता फसवणूक केली.
हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.