- September 28, 2022
- No Comment
चक्क सराफाला विकले खोटे सोने, तीस हजारांची फसवणूक
वाकड: सराफालाखोटेसोनेविकून30 हजारांची फसवणूक केली .ही घटना शिवनेरी ज्वेलर्स , वाकड येथे घडली .
राजकिरण पोपट पाटील (वय 40, रा. वाकड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 25) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला (रा. गजानन महाराज मंदिर मठ, आळंदी), सुरज पांडुरंग निरपाल (वय 22, रा. औसा रोड, लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या दुकानात ग्राहक बनून आले. आरोपी महिलेने व्यंकटेश ज्वेलर्स लातूर या दुकानातून सोने खरेदी केल्याची पावती दाखवली आणि 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार देऊन मुलाच्या उपचारासाठी तातडीने पैसे पाहिजे असे कारण सांगत फिर्यादीकडून 30 हजार रुपये घेतले. महिलेने दिलेला हार हा सोन्याचा नसून नकली आहे, हे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.