• September 30, 2022
  • No Comment

गुन्हे शाखेकडून मटक्याच्या अड्डयांवर छापे, वीस जण ताब्यात

गुन्हे शाखेकडून मटक्याच्या अड्डयांवर छापे, वीस जण ताब्यात

हडपसर,येरवडा: पुणे शहरातील येरवडा आणि हडपसर परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टकला.

या कारवाई 20 जणांवर कारवाई करण्यात आली असून 1 लाख 14 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

येरवडा: मंगळवारी (दि.28) येरवडा येथील भाटनगर परिसरातील श्रीकृष्ण मंदिराजवळ मुंबई मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला असता काही जण मुंबई मटका जुगार पैशावर खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी जुगार घेणारे आणि जुगार खेळवणारे अशा 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 18 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने दुसरी कारवाई 

हडपसर: (दि.28) हडपसर येथे केली. फुरसुंगी येथील साईस्वरा कॉम्पलेक्सच्या बाजूला असलेल्या दुकानामध्ये कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कल्याण मटका व पणती पाकोळी सोरट जुगार पैशावर खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 95 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाराऱ्यांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके,पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने, संदीप कोळगे, हनमंत कांबळे, अमित जमदाडे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Related post

जमीन, घर, संस्था नोंदणीसाठी नवीन नियम लागू; ई-नोंदणीद्वारे प्रक्रिया

जमीन, घर, संस्था नोंदणीसाठी नवीन नियम लागू; ई-नोंदणीद्वारे प्रक्रिया

जमीन, घर, संस्था इत्यादींची नोंदणी करणाऱ्यांसाठी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन नियम लागू झाला आहे. काल म्हणजेच १७ डिसेंबरपासून…
रात्रीच्या वेळी मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

रात्रीच्या वेळी मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, तिघांचा…

वाघोली: भरधाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले असल्याचे वृत्तसेमोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.…
पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी किंवा मृत झाल्यास… देणार आर्थिक मदत

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी…

पुणे: पुणे शहरात नैसर्गिक दुर्घटना किंवा प्राण्यांच्या हल्याच जखमी झालेल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. पुणे शहरात झाड पडून अथवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *