- October 15, 2022
- No Comment
खंडणीची मागणी करणारे सर्राइत जेरबंद
पिंपरी: हद्दीत मजुरी करायची नाही, काम करायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल म्हणून धमकी देणाऱ्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी विष्णू हनुमंत हांडे (वय 25 रा.पिंपळे गुरव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अश्विन अगरवाल (वय 40 रा.चिंचवड) व रवी शरद महाराणा (वय 35 रा.चिंचवड) यांना पिंपरी पोलिसांनी अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे माथाडी कामगार मंडळाच्या निमयमाप्रमाणे हद्दीतील मंत्रा प्रॉपर्टी येथे माल घेऊन आलेला ट्रेलर खाली करत होते. यावेळी आरोपी अश्विन व रवी तेथे आले व त्यांनी गाडी खाली करण्यावरून फिर्यादी याच्यांशी वाद घातला. नंतर रात्री पुन्हा येवून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत सकाळी सांगून सुद्धा तू गाडी का खाली केली, हा आमचा एरिया आहे, आता मला गाडीची हमाली दे.
आज गाडी खाली केलेली रक्कम आत्ताच्या आत्ता दे, पुन्हा या भागात काम करायचे असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये दे, नाही तर तुला आमच्या एरीयामध्ये काम करु देणार नाही, अशी धमकी दिली होती.
यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपींना अटक करत पुढील तपास करत आहेत.