• October 15, 2022
  • No Comment

पादाचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

पादाचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

चाकण: ट्रकच्या धडकेत एक तरूण गंभीर जखमी झाला होता. हा अपघात कुरुळी येथे घडला होता. उपचारा दरम्यान लाखनसिंग रमेशसिंग चौरासीया (वय 28 रा.कुरुळी) याचा मृत्यू झाला आहे.

त्यानुसार ट्रक चालक मुरलीधर लक्ष्मण पिसाळ (वय 51 रा. कुरुळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकाससिंग रमेश सिंग चौरसिया (वय 24 रा.कुरुळी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ बुधवारी कुरळी फाट्याकडून पायी चालत येत होता. यावेळी आरोपी याने त्याच्या ताब्यातील ट्रक वेगाने व हयगयीने चालवून मयत लखनसिंग याला जोरात धडक दिली. यात लखनसिंग याच्या डोक्याला जबर मार लागला. त्याचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यावरून चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *