• October 17, 2022
  • No Comment

पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा! अकरा हजार पदं भरली जाणार

पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा! अकरा हजार पदं भरली जाणार

महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार आहेत.

महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं 50 टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची 11 हजार 443 पदं रिक्त झाली होती.

रिक्त झालेल ही पदं 100 टक्के भरायला परवानगी मिळाली आहे. सद्यस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदं भरण्यात यावीत, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

Related post

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी किंवा मृत झाल्यास… देणार आर्थिक मदत

पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय! नैसर्गिक दुर्घटना, प्राण्यांच्या हल्ल्यात, जखमी…

पुणे: पुणे शहरात नैसर्गिक दुर्घटना किंवा प्राण्यांच्या हल्याच जखमी झालेल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. पुणे शहरात झाड पडून अथवा…
गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *