- October 17, 2022
- No Comment
दिवाळीपूर्वी एसटी प्रवास करताय, बघा तिकीट दरातील वाढ
महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात 5 ते 75 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ हंगामी असून दिवाळीच्या दरम्यान महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याच महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान, केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी एसटी प्रवास भाडेवाढ करण्यात येणार आहे. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.
एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली ही भाडेवाढ केवळ दहा दिवसांसाठी आहे. ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.
ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.