- October 17, 2022
- No Comment
महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई
कोंढवा: कोंढवा बुद्रुक येथे पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे 40 हजार चौरस फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यावेळी काही मालकांनी त्यांचे शेड स्वतःहून काढून घेतले.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील 84 मीटर डीपी रोडच्या जागेवर ही बांधकामे अनधिकृतरित्या उभी होती. यात काही पक्की तर काही पत्रा शेड होते.कोंढवा कात्रज या भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हा रस्ता प्रस्तावीत आहे. मात्र अनधिकृत बांधकामामुळे तेथे काम करणे कठीण होत असल्याने महापालिका बाधीत जागा संपादीत करणार असून महापालिका जागा मालकांना योग्य तो मोबदला देणार आहे.
सदरची कारवाई झोन दोनचे कार्यकारी अभियंता राहूल साळुंखे, उप अभियंता शंकर दुदुस्कर, कनिष्ठ अभियंता निशीकांत छापेकर, संदेश पाटील, धनंजय खोले, हेमंत कोळेकर,कुमावत तसेच अतिक्रमण विभागाचे पोलीस निरीक्षक अडागळे यांच्या पथकाने केली. यावेळी जेसीबी व जॉ कटरच्या सहाय्यांनी ही कारवाई करण्यात आली.