• December 23, 2024
  • No Comment

2 सिम कार्ड वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! टेलिकॉम कंपन्या घेऊ शकतात मोठा निर्णय

2 सिम कार्ड वापरणाऱ्यांनो लक्ष द्या! टेलिकॉम कंपन्या घेऊ शकतात मोठा निर्णय

तुम्ही 2 सिमकार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. खरंतर, अशी माहिती आहे की, फक्त 2G सेवा किंवा दोन सिम कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली जाणार आहे.

टेलिकॉम कंपन्यांना आता ग्राहकांना फक्त व्हॉईस + एसएमएस पॅक द्यावे लागतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम रेग्युलेटर ट्राय लवकरच टेलिकॉम कंपन्यांना निर्देश जारी करू शकते.

चला याविषयी समजून घेऊया. तुम्ही 2G सेवा किंवा दोन सिम कार्ड वापरत असाल तर कंपन्या सहसा डेटासह Voice + SMS पॅक देतात. परंतु सामान्यतः यूझर एका सिममधून इंटरनेटसह सर्व सर्व्हिस वापरतो, तर दुसऱ्या सिममधून तो सहसा फक्त व्हॉइस आणि एसएमएस सेवा वापरतो. अशा परिस्थितीत, असे असुनही कस्टमरला दोन्हीही सिममध्ये महागडे रिचार्ज टाकावे लागते.

त्यामुळे ट्राय टेलिकॉम कंपन्यांना नवीन सूचना जारी करणार आहे. यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी केली जातील. भारतात अजूनही 30 कोटी लोक 2G सेवा वापरतात.

सध्या, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना बंडल डेटा पॅक प्रदान करतात. याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. ट्रायने जुलैमध्ये याबाबत कंसल्टेशन पेपर जारी केले होते.

आता सिम कार्डचे नियम काय आहेत?

भारत सरकारने मोबाईल सिम कार्ड संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. जे 1 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत.

सिम कार्ड जारी करण्याचे नियम – सर्व सिम कार्ड विक्रेत्यांना (PoS एजंट्स) टेलिकॉम ऑपरेटर्सकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्यामध्ये आधार आणि पासपोर्ट सारख्या कागदपत्रांसह पोलिस पडताळणी समाविष्ट आहे.

टेलिकॉम ऑपरेटर आणि सिम विक्रेता यांच्यात लिखित करार आवश्यक असेल, ज्यामध्ये ग्राहक नोंदणी, ऑपरेशन क्षेत्र आणि उल्लंघन झाल्यास कारवाईचा तपशील असेल.

नोंदणीशिवाय सिम कार्ड विकल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांसाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाऊ शकते.

नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी किंवा विद्यमान नंबरवर सिम बदलण्यासाठी ई-केवायसी (आधार आधारित इलेक्ट्रॉनिक केवायसी) प्रक्रिया अनिवार्य आहे.

सिम कार्डच्या मोठ्या प्रमाणात विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. व्यावसायिक कनेक्शनसाठी प्रत्येक यूझर्ससाठी वैयक्तिक केवायसी आवश्यक असेल.

एका नवीन ग्राहकाला 90 दिवसांच्या कनेक्शननंतरच मोबाईल नंबर दिला जाईल, तर एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड असू शकतात. तर जम्मू आणि काश्मीर आणि ईशान्य प्रदेशात ही मर्यादा 6 सिमकार्ड आहे.

सिम कार्ड 30 दिवसांसाठी वापरले नाही तर त्याची आउटगोइंग सेवा बंद केली जाऊ शकते आणि जर ते 45 दिवस निष्क्रिय असेल तर त्याच्या इनकमिंग सेवा देखील बंद केल्या जाऊ शकतात.

या नवीन नियमांचा उद्देश बनावट सिम कार्डद्वारे डिजिटल फसवणूक आणि बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण ठेवणे आहे, ज्यामुळे यूझर्सची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

Related post

दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरु, थेट सरकार कडून मुभा

दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरु, थेट…

पुणे: नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता…
मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला नेले फरफटत, हडपसर परिसरातील घटना

मोबाइल चोरण्यासाठी तरुणाला नेले फरफटत, हडपसर परिसरातील घटना

हडपसर: पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाइल, घरफोडी, बस मध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच आता हडपसर परिसरात पादचारी तरुणाचा मोबाइल…
सलग ७२ तास सीसीटीव्ही तपासून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट ४ ची उल्लेखनीय कामगिरी

सलग ७२ तास सीसीटीव्ही तपासून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, पिंपरी-चिंचवड…

पिंपरी: महिलेला मारहाण करून सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याच्या पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. सलग ७२ तास सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिसांनी चोरट्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *