- October 20, 2022
- No Comment
साडेसतरानळी ग्रामपंचायतीसमोर अद्याप गुडघाभर पाणी,प्रशासनाचे दुर्लक्ष
हडपसर: साडेसतरानळी व मांजरीगावच्या शिवेचा रोड अक्षरशः दुर्गंधीने माखलेला असुन,समोरच पूर्वीची ग्रामपंचायत आणि सध्याचे महानगरपालिकेचे कार्यालय आहे.हजारो लोकांची वर्दळ असलेला हा रस्ता असुन,समोरच हजार लोकांचा उंबरा असलेली वस्ती आहे.
या रस्त्याच्या पाण्यातून गाडी गेली असता,हे पाणी लगतच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सततच्या तुंबलेल्या पाण्यामुळे सभोवतालीन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आले.लहान बालके या पाण्यात खेळताना आढळून येतात,या भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने कामाला ये-जा याच मार्गाने करण्याखेरीज नागरिकांना पर्याय नाही.
या भागात सतत पाणी तुंबत असल्याने कायमस्वरुपी ईलाज करण्याखेरीज पर्याय नाही.सध्यातरी महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी हे कुंभकर्णाची झोपेची भुमिका बजावताना दिसत आहेत.गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी पावसाळ्याचे पाणी साठते,यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना कली जात नाही.असेच पाणी उच्चभ्रू सोसायट्यांच्या आवारात तुंबले तर अतितात्काळ ईलाज केला जातो तसा आमच्याबाबत का नाही?हा प्रश्न सामाजिक कार्यकर्त घनषाम जगताप यांनी उपस्थित केला.