• October 21, 2022
  • No Comment

ठेकेदार बिल्डरचा हलगर्जीपणा, आणि बांधकाम कामगाराचा मृत्यू

ठेकेदार बिल्डरचा हलगर्जीपणा, आणि बांधकाम कामगाराचा मृत्यू

कोंढवा: इमारत बांधकामाचे काम सुरू असताना कोंढवाबांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराने दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला.

पाय स्लीप होऊन बिल्डिंगच्या डकमध्ये पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. कोंढवा येथील टिळेकर नगर परिसरातील एका निर्माणाधिन सोसायटीत ही घटना घडली.

मरिअप्पा मल्लप्पा वनेकरी (वय 30) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. ठेकेदार मुकुंद हनुमंत राय रेड्डी आणि बांधकाम व्यावसायिक राहुल नावंदर यांच्या विरोधात कोंढवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहेबराव मल्लय्या रामोशी (वय 48) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. मंगळवारी सकाळी 11:30 च्या सुमारास ही घटना घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरिअप्पा वनेकरी हा द्वारिकाधाम सोसायटी या निर्माणाधिन इमारतीच्या 11 नंबर या ठिकाणी काम करत होता. काम करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो बिल्डिंगच्या डकमध्ये कोसळला.

यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकाने कामगारांच्या जीविताचा दृष्टिकोनातून कसल्याही प्रकारची काळजी न घेता हलगर्जीपणा दाखवल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related post

एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा

एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं…

सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्तीच्या घरात एलपीजी गॅसच्या न्यू कनेक्शनची नितांत गरज आहे. सरकारच्या नव्या योजनेप्रमाणे म्हणजेच एलपीजी गॅस न्यू कनेक्शनमुळे एलपीजी…
पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? पहा जिल्हावार संपर्क यादी

पीएम किसान योजनेबाबत तक्रार करायची आहे? पहा जिल्हावार संपर्क…

शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी हफ्त्याची प्रतीक्षा आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना सोयीस्कर व्हावे म्हणून नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जात…
EPFO (ईपीएफओ) च्या कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदाची बातमी, लाभ घेण्यासाठी करा हे काम, नाहीतर होईल मोठ नुकसान

EPFO (ईपीएफओ) च्या कोट्यवधी सदस्यांसाठी आनंदाची बातमी, लाभ घेण्यासाठी…

ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *