- October 22, 2022
- No Comment
लाच घेणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

कोंढवा: दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी आणि तक्रारदार व्यक्तीच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षदा बाळासाहेब दगडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला लोकसेवकाचे नाव आहे. पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्या कर्तव्यावर होत्या. यासह पोलीस शिपाई अभिजीत विठ्ठल पालखी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या कुटुंबीयांवर दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी आणि फिर्यादीच्या आई-वडील आणि बहिणींना अटक न करण्यासाठी हर्षदा दगडे आणि अभिजीत पालके यांनी लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
या लाच मागणी प्रकरणात हर्षदा दगडे यांनी देखील सहाय्य केले होते. दरम्यान पडताळणी अंति या संपूर्ण प्रकरणात तथ्य आढळून आल्यानंतर लाचलुचपत विभागाकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.




