- October 27, 2022
- No Comment
विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
औंध: दिवाळीसाठी आकाश कंदील विक्री करताना त्यासाठी बेकायदेशीर वीज जोड घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. औंध परिसरात ही घटना घडली.
प्रवीण अशोक माने (वय 38) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील आयटीआय जवळ प्रवीण माने आणि महिला शांताबाई पांडुरंग खंदारे (वय 32) त्यांनी दिवाळीनिमित्त आकाश कंदील विक्रीचा दुकान थाटले होते. या दुकानासाठी जवळच असणाऱ्या फिडर पिलर मधून त्यांनी वीज घेण्याचा प्रयत्न केला.
बेकायदेशीर रित्या वीज जोड घेत असतानाच प्रवीण माने याला उच्च दाब फिडरचा जोरदार धक्का लागला. , यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.