- October 28, 2022
- No Comment
पुर्ववैमनस्यातून महिलेशी गैरवर्तन, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी: जुन्या भांडणाच्या रागातून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्या बद्दल पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरीतील मिलींदनगर येथे घडला आहे.
याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून गुणवंत शिवलिंग बुलबुले (वय 54) दोन महिला आरोपी दिनेश गोरख वडतिले (वय 25), केशव गोरख वडतिले (वय 22) सर्व राहणार काळेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीसोबत महिला आरोपीचे भांडण झाले होते. त्याच रागातून आरोपीच्या सांगण्यावरून गुणवंत याने फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादीचा हात पकडून भांडणाचा जाब विचारला व गैरवर्तन केले. तसेच इतर आरोपींनीही फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. व हाताने मारहाण केली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हाा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.