- October 28, 2022
- No Comment
पुर्ववैमनस्यातून आई व मुलाला मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
सांगवी: जुन्या भांडणाच्या रागातून एकाने चामडी बेल्टने आई व मुलाला मारहाण केली आहे. हा प्रकार जुनी सांगवी येथे घडला.
शेखर राहूल तांबे (वय 35 रा. जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली असून सुजल गील (पुर्ण नाव वय माहिती नाही, रा. जुनी सांगवी) याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोही हा फिर्यादीचा तोंड ओळखीचा आहे, फिर्यादी हे किराणा घेऊन घरी जात असताना आरोपीने चामड्याच्या पट्ट्याने मारले. थोड्या वेळाने आोरोपी फिर्यादीच्या घरी आला व त्याने फिर्यादीच्या आईलाही चामड्याच्या पट्टयाने मारहाण केली फिर्यादी यांना कोयत्याने मारहाण करत जखमी केले.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.