- October 30, 2022
- No Comment
चोरट्याने घरात घुसून केले सव्वा लाख लंपास
तळेगाव: घराच्या उघड्या दरवाजे वाटे सव्वा लाखांची चोरी करण्यात आली आहे. ही चोरी मावळ येथील जाधववाडी येथे घडली.
महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा राहिला असताना चोरट्याने दरवाज्यावाटे घरात प्रवेश करत घरातील लोखंडी पेटीतील एक लाख 35 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले.यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.