- October 30, 2022
- No Comment
चारित्र्याच्या संशयावरून एकाची हत्या
मोशी: मैत्रिणीला भेटायला गेल्यावर तिच्या पतीने एकास गंभीर जखमी करून 10 व्या मजल्यावरून ढकलून देऊन ठार मारल्याची घटना घ़डली आहे.
याप्रकरणी निलेश जोर्वेकर, वय 37 वर्षे याचा मृत्यू झाला आहे. याबाबत विजयकुमार जोर्वेकर, वय 40 वर्षे, रा. वाकड मुळ रा. कोल्हार तालुका राहता, जिल्हा अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंकज शिंदे, रा. वूड्सविला फेज 1, मोशी पुणे या अरबी विरोधात भा.द.वि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादीचा भाऊ निलेश जोर्वेकर हा काल 26 ऑक्टोबर रोजी रात्री 10.20 वा चे सुमारास त्याच्या मैत्रिणीच्या (रा. वूड्सविला फेज 1, मोशी) राहत्या घरी तिला भेटण्यासाठी गेला होता. तिचा पती पंकज शिंदे, वय 35 वर्षे याने तेथे जाऊन त्याच्या पत्नीच्या चरित्र्याच्या संश्यावरून वाद घालून कोणत्यातरी टोकदार हत्याराने पोटाच्या डाव्या बाजूस कमरेच्या वर भोकसून त्याला गंभीर जखमी केले. त्याला इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून खाली ढकलून देऊन त्याला जीवे ठार मारले आहे.