- October 30, 2022
- No Comment
कमी दरात हॉटेलमध्ये रूम बुक करून देतो सांगत दहा हजारांना घातला गंडा
सांगवि: हॉटेलमध्ये रूम बुक करण्याच्या बहाण्याने फसवणूक सवलतीच्या दरात हॉटेलमध्ये रूम बुक करून देतो असे सांगत एका व्यक्तीची दहा हजार 729 रुपयांची फसवणूक केली.हा प्रकार सांगवी परिसरात घडला.
कुसुमाकर गोखले (वय 36, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार नितीन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या बरोबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्हाट्सअप कॉल आला. त्यावरून बोलणाऱ्या नितीन नावाच्या व्यक्तीने फिर्यादी यांना हॉटेलच्या दरापेक्षा 40 टक्के कमी दराने हॉटेलमध्ये रूम देतो असे सांगितले. फिर्यादी यांना त्यांच्या मित्रांसाठी हॉटेलमध्ये दोन रूम बुक करायच्या होत्या. त्यामुळे फिर्यादींनी त्यास होकार दिला. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रजिस्ट्रेशन चार्ज, बुकिंग चार्ज, जेवणाचा चार्ज, व्हेरिफिकेशन चार्ज, नाश्त्याचा चार्ज, पर्यटन ट्रॅव्हलिंग चार्ज आणि इन्शुरन्स चार्ज अशा वेगवेगळ्या कारणांसाठी दहा हजार 729 रुपये ऑनलाइन माध्यमातून घेतले. त्यानंतर फिर्यादींना हॉटेलमध्ये रूम बुक करून न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.