- October 30, 2022
- No Comment
अनाधिकृत अतिक्रमण करून जागा हडपणार्रया पाच टाळक्यांवर गुन्हा दाखल
खेड: एका व्यक्तीच्या जागेवर अतिक्रमण करून त्या जागेत तारेचे कंपाऊंड आणि पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले. तसेच त्या ठिकाणी ताबा मालकी क्षेत्र असल्याचा फलक लावला.
याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत खेड तालुक्यातील बिरदवडी येथे घडला.
गणेश धोंडीभाऊ नाईकरे (वय 28, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार सर्जेराव काशिनाथ चौधरी, विनायक काशिनाथ चौधरी, अर्जुन सोपान चौधरी, शंकर सोपान चौधरी आणि सुरज भानुदास चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील बिरदवडी गावात फिर्यादी नाईकरे यांची बारा गुंठे जमीन आहे. आरोपी फिर्यादी यांच्या जमिनीत अनाधिकाराने प्रवेश करून जमिनीवर त्यांच्या क्षेत्रात लावलेले लोखंडी फलक उपटून काढले.
त्यात फिर्यादीचे तीन हजार रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादी यांच्या क्षेत्रात अतिक्रमण करून ते क्षेत्र ट्रॅक्टरने रोटरले. त्या क्षेत्राभोवती स्वतःचे तारेचे व सिमेंटच्या खांबाचे कंपाऊंड करून आतील बाजूस एक शेड उभारले. त्यावर लोखंडी फलक लावून त्याखाली कै. काशिनाथ राघू चौधरी यांचे ताबा मालिकेचे क्षेत्र आहे अशा मजकुराची जाहीर नोटीस लावली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.