- October 30, 2022
- No Comment
चरण्यासाठी सोडलेल्या तीन गाई चोरीला
पिंपरी: पिंपरी येथील एचए कंपनीच्या मैदानात चरण्यासाठी सोडलेल्या तीन गाई अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
विक्रम कोंडू खंडारे (वय 20, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या नऊ हजार रुपये किंमतीच्या तीन जर्सी गाय 22 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता पिंपरी येथील एचए कंपनीच्या मैदानात चरण्यासाठी सोडल्या. त्यानंतर ते घरी जेवण करण्यासाठी गेले. सायंकाळी पाच वाजता जाऊन त्यांनी मैदानात पाहिले असता त्यांच्या गाई तिथे मिळून आल्या नाहीत. तीन तासांच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्यातील जर्सी गाई चोरून नेल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.