• November 5, 2022
  • No Comment

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ, पहा सविस्तर

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ,  पहा सविस्तर

    पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत, तर दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

    फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरायची आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ५ नोव्हेंबरला, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून भरायची मुदत १० नोव्हेंबरला संपत आहे. या मुदतीत वाढ करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. दहावीची परीक्षा देणाऱ्या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

    दहावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्याचा तपशील:

    तपशील : कालावधी

    – माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी : २५ नोव्हेंबरपर्यंत

    – पुनर्परीक्षार्थी/खासगी विद्यार्थी/श्रेणी सुधार योजना, तुरळक विषय घेऊन परीक्षा देणारे/ आयटीआयचे विद्यार्थी : ११ ते २५ नोव्हेंबरपर्यंत

    – माध्यमिक शाळांनी चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत : २९ नोव्हेंबरपर्यंत

    बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा तपशीलः

    तपशील : कालावधी

    – उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रमाचे, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा कालावधी : १५ नोव्हेंबरपर्यंत (नियमित शुल्कासह) आणि १६ ते ३० नोव्हेंबर (विलंब शुल्कासह)

    – उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी चलनाद्वारे बॅंकेत शुल्क भरण्याची मुदत : २ डिसेंबरपर्यंत

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *