- December 12, 2022
- No Comment
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणातील आरोपींना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणातील आरोपींना 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ऍड सचिन भोसले यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आरोपींवर भादंवि कलम 307 आणि 353 लागू होत नाहीत यासंदर्भात आम्ही कोर्टापुढे अर्ग्युमेंट केले आहे.
भोसले म्हणाले की, आरोपीच्या विरोधातील एफ आय आर स्क्वॉश करण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत. आम्ही 40 ते 50 वकील बंधू भगिनींनी काय अर्ग्युमेण्ट करायचे त्याबाबत चर्चा केल्यानंतर कोर्टात अर्ग्युमेण्ट केले आहे.