- December 12, 2022
- No Comment
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन दिली जिवे मारण्याची धमकी

भोसरी: भोसरी येथे 12 वर्षीय मुलीचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तसेच, तिला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 10 डिसेंबर 2022 या चार महिन्यात भोसरीतील आळंदी रोड येथे घडला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रोहीत विजय पाटोळे (वय 21, रा.भोसरी) याच्यावर बाल लैगिंक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचा आहे. त्याने फिर्यादी यांची मुलगी 12 वर्षाची आहे. माहिती असताना देखील तिचा पाठलाग केला, तिला मारहाण करत अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तिच्या मनाला लज्जा उत्पन्न करत माझ्याशी लग्न केले नाही, तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.





