• January 3, 2023
  • No Comment

महिला सहकारी येताच थेट शरीरसंबंधाची मागणी

महिला सहकारी येताच थेट शरीरसंबंधाची मागणी

    पुणे : पुण्यासारख्या शांतताप्रिय शहरात सध्या वारंवार गुन्हेगारीचे प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे आणि कायद्यापुढं मोठं आव्हानं उभं राहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडला आहे. हॉटेलच्या मॅनेजरने सहकारी महिलेस केबिनमध्ये बोलावून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करुन बळजबरीने मिठी मारुन विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे


    याप्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल पांडुरंग सानप ( वय ३२, रा. बी टी कवडे रोड) आणि विनोद पवार (वय ३८, रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका हॉटेलमध्ये काम करतात. त्याच हॉटेलमध्ये राहुल सानप हा मॅनेजर आहे. राहुल सानप याची फिर्यादीवर वाईट नजर होती. त्यामुळेच राहुल सानप याने फिर्यादीला आपल्या केबिनमध्ये बोलवले. ‘तू खूप सुंदर दिसते. तुझे पाय किती भारी आहेत, माझे घर खूप मोठे आहे. रात्री माझ्या घरी चल आपण… असं म्हणत राहुलने थेट फिर्यादीला मिठी मारत तिचा विनयभंग केला. काही फिर्यादीने याची कुठे वाच्यता केली नाही.


    हा प्रकार इथेच थांबला नाही, यातील दुसरा आरोपी विनोद पवार याने फिर्यादी कामावरुन घरी जात असताना पाठलाग केला. तिला तो ‘ये सेक्सी गर्ल, राहुलची इच्छा पूर्ण कर आणि राहुलने तुझ्यासोबत जे काही केले, ते तू कोणाला सांगायचे नाही.. तू कोणाला सांगितले तर आम्ही तुला खल्लास करुन टाकू’ अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरुन फिर्यादने पोलीस स्टेशन गाठलं

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *