- March 1, 2023
- No Comment
लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी अग्नीशस्त्र बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया
अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पोलीस नाईक ७४१९ स्वप्निल जाधव यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा
मार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे विशाल ऊर्फ इशाप्पा जगन्नाथ पंदी,
वय २१ वर्ष, रा. जाधवराव यांचे बिल्डींगमध्ये, रामचंद्र कॉलेजवळ, माऊली पार्क, बकोरी रोड, पुणे हा
बकोरी रोडवरील न्याती अॅलन या साईटजवळील लेबर कॅम्प समोर रोडवर उभा असुन त्याचेजवळ पिस्टल
आहे. लागलीच नमुद बातमीची मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, यांना माहिती देवुन त्यांचे आदेशाने तपास
पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे विशाल ऊर्फ इशाप्पा
जगन्नाथ पंदी, वय २१ वर्ष, रा. जाधवराव यांचे बिल्डींगमध्ये, रामचंद्र कॉलेजवळ, माऊली पार्क, बकोरी
रोड, पुणे यास ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन ३४,०००/- रुपये
किंमतीचे ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुस जप्त करण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. रंजन शर्मा सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे
शहर, मा. श्री. शशिकांत बोराटे सो, पोलीस उपआयुक्त सो परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. किशोर
जाधव सो, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. श्री. गजानन पवार साो, वरिष्ठ
पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, मा. श्री. मारुती पाटील सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे),
लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन
जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, अजित
फरांदे, सागर जगताप, अमोल ढोणे, आशिष लोहार, मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण यांनी केली आहे.