• March 9, 2023
  • No Comment

आम्ही या एरिया मधील भाई आहे म्हणत कोयते घेऊन दहशत माजवणारया चार तरुणांना पुणे पोलिसांनी केली अटक

आम्ही या एरिया मधील भाई  आहे म्हणत कोयते घेऊन दहशत माजवणारया चार तरुणांना  पुणे पोलिसांनी केली अटक

आम्ही या एरिया मधील भाई म्हणत चार तरुणांनी कोयते घेऊन दहशत माजवली आहे. पुण्यातील उत्तमनगर भागात चार जणांनी कोयता घेऊन पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. यामुळे परिसरात सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या चारही जणांना पुणे पोलिसांन अटक केली आहे.

चंद्रकांत सुतार (30), सूरज गायकवाड (22), राहुल धोडगे (28), अथर्व यनपुरे (19) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चार जणांनी उत्तम नगर परिसरात कोयते घेऊन दहशत माजवली होती. बळजबरी करायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि या परिसरात भीतीचं वातावरणदेखील निर्माण झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांची कोणाशी तरी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या चारही जणांनी मिळून त्या व्यक्तींना शोधण्यासाठी उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसरात या ठिकाणी आले. या परिसरात येताच त्यांनी त्यांच्या जवळील कोयते काढले आणि दुचाकीवरून परिसरात दहशत माजवली. “आम्ही या एरिया मधील भाई आहोत, कोणी आमच्यामध्ये आलं तर खल्लास करून टाकू” असे म्हणत त्यांनी नागरिकांवर कोयते उगारले. दरम्यान, त्यांनी या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील फ्रिजवर पडलेला पेव्हर ब्लॉक मारला. या घटनेमुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता.

काही वेळ गोंधळ घातल्यानंतर या चार जणांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या सगळ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *