- March 9, 2023
- No Comment
अनाधिकृत सावकारी करण्या-यास केले जेरबंद
पुणे शहरात चालू असलेल्या बेकायदेशीर सावकारीवर आळा बसण्यासाठी जादा व्याजाने पैसे देणाऱ्या सावकारांवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडुन प्राप्त झालेल्या आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथक – १, गुहे शाखा यांच्याकडे धानोरी येथील सावकारा
विरूद्ध १५% व्याज दराने घेतलेले पैसे परत करून ही त्याला व त्याच्या कुटुंबास शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देवून अर्जदार यांची दुचाकी ठेवून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.प्राप्त तक्रारी अर्जाची चौकशी मध्ये अर्जदार यांनी ३० हजार रूपये १५% व्याजाने घेतले असता त्याबदल्यात ४० हजार रूपये रोख दिलेले होते. तरी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची मोटार सायकल व गाडीचे पेपर सिक्यूरीटीपोटी स्वतःकडे ठेवून त्यांचेकडे आणखीन पैशांची मागणी करत होता व पैसे मागणी करत असताना अर्जदार
व त्यांचे आई-वडिल यांना रात्री घरी जावून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे निष्पन्न झाल्याने गैर-अर्जदार अक्षय विजय आल्हाट, वय २५ वर्षे, रा. लेन नं.३,सर्वे नं.१७,सिद्धार्थनगर, धानोरी, पुणे यांचेविरूद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं.७४/२०२३ भादंवि कलम ३८७,५०४,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कामगिरी सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री.रितेश कुमार, मा.पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. अमोल
झेंडे, मा.सहा.पो. आयुक्त गुन्हे – १ श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,अजय वाघमारे, खंडणी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे, पो.उप.निरी.विकास जाधव, पोलीस अंमलदार, अमोल आवाड, अमर पवार, प्रमोद सोनावणे, मधुकर
तुपसौंदर, रविंद्र फुलपगारे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव व संभाजी गंगावणे यांनी केली आहे.