- March 9, 2023
- No Comment
लोणीकंद पोलीस सायबर तपास पथकाने हरवलेले एकुण २१ अॅप्पल, सॅमसंग, वन प्लस, व्हिवो, ओप्पो, रिअल मी, एम आय असे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन केले हस्तगत
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल हरवलेबाबत तक्रारी नोंद केलेल्या होत्या. सदर तक्रारींची दखल घेऊन हरवलेले मोबाईल फोन याचा शोध घेऊन ते हस्तगत करणेबाबतचे आदेश वरिष्ठ पो.निरी.गजानन पवार यांनी लोणीकंद सायबर तपास पथकास दिलेले होते.
त्याअनुशंगाने लोणीकंद सायबर तपास पथकाने फिर्यादी यांचे हरवलेले मोबाईलबाबत अधिकची माहीती प्राप्त करुन, तसेच तांत्रिक विश्लेषण करुन विविध भागातुन एकुण २१ अॅप्पल, सॅमसंग, वन प्लस, व्हिवो, ओप्पो, रिअल मी, एम आय असे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हस्तगत केले व ते तक्रारदार यांना मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०४,श्री. शशिकांत बोराटे यांचे हस्ते सुपुर्त
केले. तक्रारदारांनी लोणीकंद सायबर तपास पथक यांचे आभार मानले.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री.रंजनकुमार शर्मा, सद्या अतिरिक्त कार्यभार, मा. अपर पोलीस आयुक्त,गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ-०४,श्री.शशिकांत बोराटे, मा.सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. किशोर जाधव,वरिष्ठ पो.निरी.गजानन पवार, पोलीस निरीक्षक, गुन्हे, मारुती पाटील यांचे मार्गदर्शना खाली लोणीकंद पो स्टे सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक, सुरज गोरे, पोलीस अंमलदार, समीर पिलाणे, सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले व वृंदावनी चव्हाण यांनी केलेली
आहे.