- March 9, 2023
- No Comment
दुचाकी चोरी करणार्या दोघांना अटक करुण त्यांच्याकडून ८ मोबाईल, दुचाकी असा १ लाख ८५ हजार रुपयांचा माल जप्त
पुणे : दुचाकीची चोरी करुन त्यावरुन फिरुन घरफोडी करायची, त्यानंतर ती दुचाकी पुन्हा त्याच जागी लावायची अशी युक्ती करणार्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून ८ मोबाईल, दुचाकी असा १ लाख ८५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. नशा करण्यासाठी ते घरफोडी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
युवराज सिंग गुरुबच्चन कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर) असे त्याचे नाव असून त्याचा साथीदार अल्पवयीन आहे.
लष्कर परिसरात एक घरफोडीचा गुन्हा बुधवारी दाखल करण्यात आला होता. त्याचा समांतर तपास युनिट २ चे पथक करत होते. त्या परिसरातील ३५ सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले संशयित धोबीघाट येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार कादिर शेख व समीर पटेल यांच्या बातमीदारांनी दिली. त्यावरुन पोलिसांनी तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये ८ मोबाईल व चोरीची दुचाकी मिळाली.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी कॅम्प परिसरातील हॉटेल व ज्युस सेंटरची शटर उचकटून लॉक तोडून त्यातील ८ मोबाईल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून लष्कर पोलीस ठाण्यातील २ आणि स्वारगेट व वानवडी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.