• March 9, 2023
  • No Comment

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणारयऻ महिलेस केले अटक

हाय प्रोफाईल मॉल मध्ये चोरी करणारयऻ महिलेस केले अटक

    एका अनोळखी महिलेने ब्ल्यु स्टोन शॉप नंबरजी – २९, लोअर
    ग्राऊन्ड फ्लोअर,फिनिक्स मार्केटसिटी, विमाननगर, पुणे या दुकानात प्रवेश करुन दागिने खरेदीच्या बहाण्याने फिर्यादी यांची नजर चुकवुन एक सोन्याचे ब्रेसलेट २,८२,७५०/- रू किचे लबाडीच्या इराद्याने चोरुन नेलेबाबत विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. १२४/२०२३, भा. द. वि. कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे. त्या अनुशंगाने दाखल गुन्हयाचा समांतर तपास करुन आरोपीचा शोध घेणेबाबत पोलीस
    निरीक्षक,गणेश माने यांनी आदेश दिले. प्राप्त आदेशाप्रमाणे युनिट-४ कडील पथक यांनी विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत संशयीत महिलेचा शोध घेत वडगांव- शेरी येथील विठ्ठलनगर येथे आले असताना, “फिनिक्स मॉल मध्ये चोरी करुन काळया रंगाची स्कुटरवरुन पळुन गेलेली संशईत महिला ही अनुग्रह सोसायटी येथे रहात आहे.” अशी खात्रीशिर बातमी मिळाली. प्राप्त बातमीप्रमाणे युनिट ४ कडील पथक अनुग्रह सोसायटी, वडगांव- शेरी, पुणे या सोसायटीचे पार्किंग
    मध्ये काळ्या रंगाची स्कुटर पार्क केलेली दिसली. त्याबाबत अधिक माहिती घेता सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ११ मध्ये राहणारी महिलेची असल्याचे समजले. त्याप्रमाणे फ्लॅट मध्ये जाऊन खात्री करता,नमुद फ्लॅट मध्ये राहणा-या महिलेस महिला पोलीस अंमलदार, वैशाली माकडी यांनी ताब्यात घेवून, तिचे नाव पत्ता विचारता तिने तिचे नाव अनु वेदप्रकाश शर्मा, वय – ३० वर्षे, रा. फ्लॅट नंबर ११, अनुग्रह सोसायटी, विठ्ठलनगर,वडगांव-शेरी, पुणे, मुळ रा. गांधीनगर, दिल्ली असे असल्याचे सांगितले.तिचेकडे दाखल गुन्हयाच्या अनुषांगने अधिक तपास करता, तीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आहे. तीचेकडून दाखल गुन्ह्यातील चोरलेले २,८२,७५०/- रूकिचे ब्रेसलेट पंचनाम्याने जप्त करणेत आले
    आहे. तसेच तीस अधिक विश्वासात घेवून तपास करता, तीने जुन २०२२ मध्ये फिनिक्स मॉल येथील रिलायन्स ज्वेलर्स येथे अश्याच पध्दतीने एक सोन्याची बांगडी चोरुन नेल्याची कबुली दिली.

    त्याबाबत विमानतळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२२ / २०२२ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. सदर महिलेकडून १) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. १२४/२०२३ भा. द. वि. कलम ३८० २) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं.२२२ / २०२२ भा.द.वि. कलम ३८० हे दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहे. सदर महिला आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाईकामी विमानतळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
    सदरची उल्लेखनियकामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, शाखा, पुणे,श्री.अमोल झेंडे, मा.सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-२, श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक, गणेश माने यांचे मार्गदर्शना
    खाली सहा.पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस अंमलदार, संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद
    महाजन, स्वप्निल कांबळे, वैभव रणपिसे, वैशाली माकडी यांनी केली आहे.

    Related post

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

    रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

    पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *