- March 10, 2023
- No Comment
लोणीकंद पोलीसांकडून गाडयांचे कर्कश आवाज करणा-या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई
तिथी नुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज जंयतीच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे आदेशाने कायदा सुव्यवस्था राखणेकामी सकाळी ०६:०० वा पासुन बंदोबस्त लावण्यात आलाहोता.दि.०९/०३/२३ रोजी पुणे पोलीस मुख्य नियंत्रण कक्ष येथे दुचाकी स्वार गाडयांचे सायलन्सर काढून मोठ मोठे कर्कश आवाज करुन वृद्धांना व सामान्य नागरिकांना त्रास होत असलेबाबत कॉल प्राप्त झाले होते. सदर कॉलचे
अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, यांनी सदर गाडयांवर कारवाई करणेकामी एक पथक नेमले होते. सदर
पथकाने वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी चौक, केसनंद फाटा व लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी
पाळत ठेवून एकुण १५ गाडया ताब्यात घेवुन त्यांना वाघोली पोलीस चौकी येथे आणुन त्यांचेवर वाहतुक पोलीसांचे
मदतीने कायदेशिर दंडात्मक कारवाई करुन गाडयांचे कागदपत्र तपासुन गाडया ताब्यात देण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री रामनाथ पोकळे सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर. मा.श्री.
शशिकांत बोराटे साो, पोलीस उप आयुक्त साो,
परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री किशोर जाधव साो, सहा. पोलीस आयुक्त , येरवडा विभाग, पुणे शहर, मा. श्री. गजानन पवार साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर,मा.श्री.मारुती पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राहुल कोळपे पोलीस उप निरीक्षक, श्री महादेव लिंगे. पोलीस उपनिरीक्षक, श्री राम दळवी पोलीस उपनिरीक्षक,पोना तिकोणे,पो.ना.रितेश काळे, पो. शि. कुणाल सरडे, पो. शि. सुभाष भुरे, पो. शि. नितीन मोरे, पो. शि. तुषार पवार,पोशि सातव, पोशि क्षीरसागर, पोशि असवले व वाघोली मार्शल पोशि बोयणे, पोशि वाघ यांनी केली आहे.