• March 11, 2023
  • No Comment

दहशत माजविणारा गुंड सचिन माने याच्यासह १३ साथीदारांच्या विरुद्ध मोक्का कारवाई

दहशत माजविणारा गुंड सचिन माने याच्यासह १३ साथीदारांच्या विरुद्ध मोक्का कारवाई

पुणे : गुलटेकडीतील औद्योगिक वसाहतीत दहशत माजविणारा गुंड सचिन माने याच्यासह १३ साथीदारांच्या विरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी सचिन परशुराम माने (वय २४), रोहित मधुकर जाधव (वय २७), अजय प्रमोद डिखळे (वय २४), यश किसन माने (वय १८), अमर तानाजी जाधव (वय ३२), विजय र्पमोद डिखळे (वय १८), मोन्या उर्फ सूरज सतीश काकडे (वय २६, सर्व रा. ओैद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखील राकेश पेटकर (वय २२, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. माने याच्यासह आठ साथीदारांना अटक करण्यात आली असून उर्वरित चार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.


माने याच्यासह साथीदारांनी गुलटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत दहशत माजविली होती. दरोडा, जबरी चोरी, खंडणी, हप्ते गाेळा करणे, खुनाचा प्रयत्न, मुलींची छेड काढणे असे गंभीर गुन्हे माने आणि साथीदारांच्या विरुद्ध दाखल झाले आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, प्रमोद कळमकर यांनी या टोळीच्या विरुद्ध माेक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. पोलीस आयुक्तांनी या प्रस्तावास नुकतीच मंजुरी दिली. सहायक आयुक्त सुनील पवार तपास करत आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील १६ गुंड टोळ्यांच्या विरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *