- April 10, 2023
- No Comment
मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने केला विनयभंग
पुणे : एकत्र राहणाऱ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड मुंबईहून तिला भेटायला आला. त्याने आपल्या गर्लफ्रेंड ऐवजी तिच्या मैत्रिणीबरोबरच अश्लिल वर्तन करुन विनयभंग केला. मुंढव्यातील केशवनगरमधील एका सोसायटीत हा प्रकार घडला. याप्रकरणी एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजिंक्य रमेश सावंत (वय २६, रा. मेघवाडी, लालबाग, लोअर परळ, मुंबई) याला अटक केली आहे.
फिर्यादी या मैत्रिणीबरोबर केशवनगरमधील एका सोसायटीत भाड्याने राहतात. मैत्रिणीचा बॉयफ्रेंड अजिंक्य सावंत हा तिला भेटायला मुंबईहून आला होता. शनिवारी सकाळी फिर्यादी या त्यांच्या रुममध्ये झोपलेल्या होत्या. तेव्हा अजिंक्य हा नग्न अवस्थेत फिर्यादीच्या समोर जाऊन उभा राहिला. फिर्यादीस स्पर्श करुन फिर्यादीच्या खांद्याला व हाताला पकडून त्यांच्या अंगावर पडला. त्याला फिर्यादी यांच्या मैत्रिणीने विरोध केल्यावर तिला मारहाण केली. त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी अजिंक्य सावंत याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक गाडे तपास करीत आहेत.