• April 26, 2023
  • No Comment

मोठी बातमी! इतर सुविधांसह मोफत घेता येणार रेशनचा लाभ, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

मोठी बातमी! इतर सुविधांसह मोफत घेता येणार रेशनचा लाभ, सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

देशात प्रत्येकाकडे रेशन कार्ड आहे. याच रेशन कार्डवरून पात्र रेशन कार्डधारकांना धान्याचा लाभ घेता येतो. जर तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि तुम्हीही धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण आता पात्र कार्डधारकांना मोफत रेशनचा लाभ घेता येणार आहे. इतकेच नाही तर त्यांना इतर सुविधा मिळणार आहेत. सर्वसामान्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. न्यायालायकडून यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्या आदेशात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या स्थलांतरित मजुरांना शिधापत्रिकेसाठी व्यापक प्रसिद्धी मिळावी. इतकेच नाही तर ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत योजनेचा लाभ घेऊ शकतील याची खात्री करून घ्यावी.

याबाबत न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की केंद्र आणि राज्य सरकार यांना फक्त NFSA अंतर्गत लोकसंख्येचे प्रमाण योग्यरित्या राखले गेले नसल्याच्या आधारावर स्थलांतरित कामगारांना शिधापत्रिका नाकारता येत नाहीत. देशातील सर्व नागरिकांना कल्याणकारी योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या सुविधाही देण्यात येणार

आकडेवारी जाहीर करत असताना केंद्र सरकारकडून असे सांगण्यात आले की, मदतीसाठी बनवण्यात आलेल्या या लेबर पोर्टलवर 28.86 कोटी कामगारांची नोंदणी झाली आहे. 24 राज्ये आणि त्यांचे कामगार विभाग यांच्यात डेटा शेअरिंग करण्यात येत आहे. 20 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे लाभार्थी आहेत. त्यामुळे जर तुम्हीही कार्डधारक असल्यास सरकारकडून तुम्हालाही दर महिन्याला मोफत रेशन मिळत असेल, तर ही बातमी महत्त्वाची आहे.

कार्ड धारकांना मोफत रेशन आणि सरकारी योजनांचा लाभ यासह अनेक मोठे फायदे देण्यात येत आहेत. मोफत आणि स्वस्त रेशनसोबतच रेशनकार्डच्या माध्यमातूनही लोकांना सुविधा देण्यात येत आहेत. यासाठी त्यांना पत्ता पुरावा म्हणून शिधापत्रिका वापरण्याचे स्वातंत्र्य दिले गेले असून बँकेशी निगडित कामासाठी आणि गॅस कनेक्शन घेण्यासाठीही रेशनकार्डचा वापर केला आहे.

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *