• April 27, 2023
  • No Comment

गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक ट्रकला पकडून दोन जणांना अटक

गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक ट्रकला पकडून दोन जणांना अटक

पिंपरी : गोवा राज्यातील विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या तस्करीवर कारवाई केली जात आहे. त्यात औषधांच्या नावाखाली अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अवैध मद्याची वाहतूक होत असलेल्या ट्रकला पकडून दोन जणांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साइज) मुळशी तालुक्यात सोमवारी ही कारवाई केली.

दानाराम चुनाराम नेहरा, रुखमनाराम खेताराम गोदरा, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एक्साइजचे पुणे येथील अधीक्षक चरणजितसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या सासवड विभागाच्या पथकाने मुळशी तालुक्यातील माले या गावाच्या हद्दीत पुणे-माणगाव मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. त्यावेळी एक ट्रक थांबवला असता ट्रकचालकाच्या हालचाली संशयित वाटल्या. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी सुरू केली. ट्रकमध्ये काय असे त्याला विचारले. ट्रकमध्ये औषधे व इंजेक्शन आहेत, असे ट्रक चालकाने सांगितले. मात्र, त्याचा संशय आल्याने पथकाने ट्रकमध्ये तपासणी सुरू केली. गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले ४६ लाख ६७ हजार ५२० रुपयांचे मद्य ट्रकमध्ये मिळून आले. हे मद्य आणि ट्रक, मोबाइल असा एकूण ५७ लाख २५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
एक्साइजचे सासवड विभागाचे निरीक्षक पी. सी. शेलार, दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, जवान तात्या शिंदे, रणजित चव्हाण, सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, भागवत राठोड, भगवान रणसुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related post

नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीएतर्फे अनधिकृत गाळ्यांवर कारवाई

नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीएतर्फे अनधिकृत गाळ्यांवर…

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुण्यातील नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी सोमवारी (द‍ि.२३) सकाळी सात वाजल्यापासून कारवाई…
मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गरीबांसाठी वर्षभरात 19 लाख 66 हजार घरे देणार; केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गरीबांसाठी वर्षभरात 19…

पुणे: आज किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय…
ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं? पहा नविन नियमावली!

ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं? पहा नविन नियमावली!

तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (DL) हरवले असेल तर नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. लायसन्स हरवल्यास काही गोष्टींची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *